Facebook
Youtube
Telegram
Close

June 6, 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०६ जून २०१९

०७ जून: जागतिक अन्न सुरक्षा दिन

● संकल्पना २०१९ : “Food Safety , Everyone’s Business “

● एफटीआयआयच्या दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता म्हणून जी. बी. सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे

● बिकट अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानच्या सैन्याने आपल्या अर्थसंकल्पात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे

● जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर म्हणून मुंबई अव्वल स्थानी : टोमटोम ट्राफिक इंडेक्स २०१८

● जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या शहरात नवी दिल्ली चौथ्या स्थानी : टोमटोम ट्राफिक इंडेक्स २०१८

शाकिब-अल-हसन २०० एकदिवसीय सामने खेळणारा बांगलादेशचा तिसरा खेळाडू ठरला आहे

विराट कोहली सर्वात जलद ५० एकदिवसीय सामने जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला आहे

● न्युझीलंडचा ट्रेन्ट बोल्ट एकदिवसीय सामन्यात १५० बळी घेणारा दुसरा सर्वात जलद गोलंदाज

● भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला ( १०८ सामने )

● आयसीसी २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्युझीलंडने बांगलादेशला २ विकेट्सनी पराभूत केले

● बंगळुरू रायनोजने इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग २०१९ चे विजेतेपद पटकावले

● दक्षिण कोरियाकडून दारिद्रयामुळे अडचणीत आलेल्या उत्तर कोरियाला ८ दशलक्ष डॉलरची मदत

● जी-२० देशांच्या अर्थमंत्र्यांची परिषद ८ जून रोजी जपान येथे आयोजित करण्यात आली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन जपान येथे होणाऱ्या जी-२० देशांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार

● बांग्लादेशची प्रसिद्ध अभिनेत्री अंजू घोष हिने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे

● पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना घातलेली बंदी उठवली

● प्रसिद्ध अभिनेते दिनयार कॉन्ट्रैक्टर यांचे निधन , ते ७९ वर्षांचे होते

● विप्रोने अमेरिका स्थित कंपनी ‘इंटरनेशनल टेक्नेग्रुप इंकारपोरेटेड’ ला ३१२ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले

● उत्तराखंड चे अर्थमंत्री प्रकाश पंत यांचे निधन , ते ५८ वर्षांचे होते

● उत्सर्जन व्यापार सुरू करणारे गुजरात भारतातील पहिले राज्य बनले

● जागतिक बँकेने तमिळनाडूला आरोग्य देखभाल सुधारसाठी २८७ दशलक्ष अमेरिकन डाँलर्सचे कर्ज प्रदान केले

● थायलंडच्या संसदेने प्रयुत चन्-ओचा यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ति केली

● नेपाळ सरकारने माउंट एव्हरेस्टवरुन २ महिन्यांत ११००० किलो कचरा जमा केला

● ५ जूनपासून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशियाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत

● आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने २०१९ मध्ये चीनचा आर्थिक वाढीचा दर ६.२% असेल असा अंदाज वर्तवला आहे

● आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने २०२० मध्ये चीनचा आर्थिक वाढीचा दर ६% असेल असा अंदाज वर्तवला आहे

● भारतात दरवर्षी ५ वर्षाखालील १ लाख बालकांचा म्रुत्यु वायु प्रदुषणामुळे होतो : अहवाल

● इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ने ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदीची शिफारस केली आहे

डॅनिलो पेट्रुसीने इटालियन ग्रँड प्रिक्स २०१९ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● २१ वी यूएसआयसी वर्ल्ड रेल्वे टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा बल्गेरिया येथे आयोजित करण्यात आली होती

भारतीय संघाने २१ वी यूएसआयसी वर्ल्ड रेल्वे टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

प्रहलाद सिंग पटेल यांनी पर्यटन मंत्री म्हणून पदभार स्वीकारला

● एलटी फायनान्शियल सर्व्हिसेसने ‘डिजिटल सखी’ महिलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला

● आयसीआयसीआय बँकेने सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी बेंगलुरुमध्ये केंद्र सुरू केले

भारतीय जूनियर महिला हॉकी टीम वॉन कॅंटोर फिट्झगेराल्ड अंडर-२१ इंटरनॅशनल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

जियानी इन्फँटिनो यांची फिफाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली

● २ रे जागतिक अपंगत्व शिखर सम्मेलन अर्जेंटिना येथे आयोजित करण्यात येणार

● चौथी चतुर्भुज सुरक्षा संवाद परिषद बँकॉक , थायलंड येथे आयोजित करण्यात आली

सिद्धार्थ रावत ने आयटीएफ मेन्स फ्यूचर्स सिंगल्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● यंदाच्या आर्थिक वर्षातील पतधोरण आज रिजर्व्ह बँकेने जाहीर केले आहे

● आरबीआयने आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये भारताचा जीडीपी दर ७% राहील असा अंदाज वर्तविला आहे

● रिजर्व्ह बँकेने रेपो दरात ०.२५ टक्क्यांने कपात केली , आता रेपो दर ५.७५ टक्के इतका झाला आहे

● रिझर्व्ह बँकेने आरटीजीएस आणि एनईएफटीवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे

● रिव्हर्स रेपो दर हा ५.५०% तर बँक रेट ६% इतका राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे .

Please follow and like us: