May 24, 2019
Environment Notes – 24/05/2019
8 Mission under National Action Plan on climate change (NAPCC)
- National Solar Mission
- National mission for enhanced energy Efficiency
- National Mission on Sustainable habitat
- Mission on water
- National mission for sustaining the Himalayan ecosystem
- National mission for ‘Green India’
- National mission for sustainable agriculture
- National Mission on strategic knowledge for climate change
Plus 3 new
- National Mission on impact of Climate Change on health
- National Mission on waste to energy
- National Mission on coastal zones
आंतरराष्ट्रीय सौर संघटनेत अर्जेंटिनाचा प्रवेश
- भारताच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर संघटनेत (International Solar Alliance ) अर्जेंटिनाचा 72वा सदस्य म्हणून समावेश झाला आहे.
- भारताने भविष्यातील ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता.
- 30 नोव्हेंबर 2015 ला पॅरिस येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय जल वायू संमेलनात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सिस होलांदे यांनी याबाबत महत्वाची भूमिका मांडली होती.
- फ्रान्सने आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी 2022 पर्यंत 2200 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे.
- आंतरराष्ट्रीय सौर संघटनेने 2030 पर्यंत एक ट्रिलियन वॅट(1000 गिगा वॅट) सौर ऊर्जा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी एक ट्रिलियन डॉलर खर्च होईल अशी शक्यता आहे.
- आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे मुख्यालय भारतात स्थापन करण्यात आले असून भारतात मुख्यालय असलेली ही एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
- हरियाणा मधील गुरगाव येथील ग्वाल पहारी येथील राष्ट्रीय सौर ऊर्जा संघटनेच्या परिसरातच आय एस ए (ISA)च्या मुख्यालयाची उभारणी करण्यात येत आहे.
- आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा मुख्य उद्देश सौरऊर्जेच्या वापराला चालना देणे व त्यामध्ये येणारे अडथळे दूर करणे आहे.
- 20 फेब्रुवारी 2019 रोजी सौदी अरेबियाने आय एस ए (ISA) फ्रेमवर्क वर स्वाक्षरी केल्याने तो आय ए एस (ISA) चा 73 वा सदस्य झाला आहे. आय एस ए(ISA) चा तो सातवा ऑपेक(OPEC) राष्ट्र समूहातील सदस्य ठरला आहे.