परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात रिझर्व्ह बँक सहाव्या क्रमांकावर

Please follow and like us:
January 22, 2020

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) इतर देशांच्या प्रमुख केंद्रीय बँकांच्या तुलनेत परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात सहावा सर्व मोठा खरेदीदार ठरला आहे.
RBIने भारत सरकारच्या ‘सार्वभौम सुवर्ण बाँड’साठी 2019 या वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांमध्ये 25.2 टन खरेदी केले होते त्यामुळे RBI सहाव्या क्रमांकाचा खरेदीदार झाला.
जागतिक सुवर्ण परिषद (WGC) यांच्या अहवालानुसार,
RBI कडे 625.2 टन सुवर्ण (सोने) आहे आणि ते प्रमाण परकीय चलन साठ्याच्या 6.6 टक्के आहे.
2019 या साली भारताच्या आधी अनुक्रमे चीन, रशिया, कझाकस्तान, तुर्की, पोलंड या देशांच्या केंद्रीय बँका परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात सर्वात मोठे खरेदीदार ठरले.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) गेल्या ऑक्टोबर 2019 या महिन्यामध्ये 7.5 टन सोने खरेदी केले होते आणि परकीय चलन साठा 450 अब्ज डॉलरपर्यंत भक्कम केला.
जागतिक सुवर्ण परिषद (WGC)
1987 साली स्थापना झालेली जागतिक सुवर्ण परिषद (WGC) ही सुवर्ण उद्योग बाजारपेठेसाठीची जागतिक विकास संस्था आहे.
ही सोन्याचे खनिकर्म यापासून ते गुंतवणूक अश्या उद्योगांच्या सर्व भागात कार्य करते. ते भारत आणि चीनमध्ये देखील SPDR GLD आणि सुवर्ण ठेव योजना अश्या विविध उत्पादनांना चालवते.
त्याचे मुख्यालय लंडन (ब्रिटन) येथे आहे तसेच भारत, चीन, सिंगापूर, जापान आणि अमेरिका येथे विभागीय कार्यालये आहेत.