Facebook
Youtube
Telegram
Close

December 12, 2019

चालू घडामोडी – 12/12/2019

बोगेनविले: जगातला नवा देश बनण्याच्या मार्गावर

  • पापुआ न्यू गिनीपासून स्वातंत्र्य मिळवून जगातला सर्वात नवीन देश होण्याची घोषणा 11 डिसेंबर 2019 रोजी बोगेनविले या प्रदेशाच्या दक्षिण प्रशांत क्षेत्राच्या बोगेनविले सार्वमत आयोगाकडून करण्यात आली. बोगेनविले सार्वमत आयोगाचे अध्यक्ष बर्ट्टी अहेरन यांनी ही घोषणा केली आहे.
  • आता स्वातंत्र्यासाठी बोगेनविले आणि पापुआ न्यू गिनी यांच्या नेत्यांदरम्यान वाटाघाटी होणे आवश्यक आहे. त्यानंतर पापुआ न्यू गिनीच्या संसदेत अंतिम निर्णय घेतला जाणार. अद्याप संयुक्त राष्ट्रसंघाकडून या निर्णयाला मान्यता मिळालेली नाही.
  • बोगेनविले प्रदेशातल्या लोकांनी अलीकडेच पापुआ न्यू गिनीपासून वेगळे होण्याविषयी मतदान केलेले आहे. सुमारे 85 टक्के पात्र मतदारांनी दोन आठवड्यांच्या मतदानात 181,000 हून अधिक मत दिले.

 

पार्श्वभूमी

  • 2001 सालाच्या शांतता कराराचा हा एक मुख्य भाग आहे. या करारामुळे गृहयुद्ध संपुष्टात आणले गेले, ज्यामध्ये पापुआ न्यू गिनी मुख्य भूमीच्या पूर्वेकडे असलेल्या बेटांवरील कमीतकमी 15 हजार लोकांचा मृत्यू झाला.
  • बोगेनविले हा प्रदेश तांबे धातूच्या प्रचंड साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. 1980 सालाच्या उत्तरार्धात पांगुना येथे असलेल्या खाणीवरून संघर्षास सुरुवात झाली. ही खाण पापुआ न्यू गिनीसाठी महत्त्वाची होती. परंतू तेथल्या खनिकर्मामुळे लोकांच्या पारंपारिक राहणीमानावर प्रतिकूल परिणाम झाल्याचा त्यांनी राग व्यक्त केला.

 

बोगेनविले विषयी

  • बोगेनविले हा सोलोमन द्विपसमूहाचा (आर्किपॅलागो) एक सर्वात मोठा द्वीप/बेट आहे. या बेटावर प्रचंड प्रमाणात तांबे धातूचे साठे आहेत. या प्रदेशात सर्वाधिक प्रमाणात बोलली जाणारी भाषा हलिया ही आहे.
  • पापुआ न्यू गिनीच्या बोगेनविले या स्वायत्त प्रदेशाचे मुख्य बेट बागेनविले बेट आहे. या प्रदेशास बोगेनविले प्रांत किंवा उत्तर सोलमन म्हणूनही ओळखले जाते. त्याचे भूक्षेत्र 9,318 चौरस किलोमीटर एवढे आहे. या प्रांताची लोकसंख्या जवळपास 2,34,280 इतकी आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *