Facebook
Youtube
Telegram
Close

July 13, 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स, १३ जुलै २०१९

● जूनमध्ये किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा ३.१८ पर्यंत पोहचला

नोव्हाक जोकोव्हीच २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

राँजर फेडरर २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

● आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून श्रीलंकेचे कुमार धर्मसेना व दक्षिण अफ्रिकेचे मारियस इरॅस्मस यांची नियुक्ती करण्यात आली

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात सचिन सिंहने सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात पापुल चांगमईने रौप्यपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८७ किलो वजनी गटात पी अनुराधाने सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८९ किलो वजनी गटात आर वी राहुलने रौप्यपदक पटकावले

यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा तुर्की मध्ये आयोजित करण्यात आली

● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत मंजु कुमारीने ५९ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले

● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सीमा कुमारीने ५० कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले

● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कर्षा काळेने ६१ कीलो वजनी गटात कांस्यपदकपदक पटकावले

● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत राहुल आवारेने पुरुषांच्या ६१ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले

टीव्हिएस मोटर्सने भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी लाँच केली

● स्टेट बँक आँफ इंडियाकडून एनईएफटी , आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्क रद्द

● अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या सर्व प्रकारासाठी राशिद खानकडे कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली

अंशुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे

● जागतिक बँकेच्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत

● उत्तराखंड २८ जुलैरोजी मसुरी येथे पहिली हिमालयी राज्य परिषद आयोजित करणार

● पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर मध्ये अमेरिकेला भेट देणार आहेत

● २०-२३ जुलै दरम्यान होणा-या संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील

● कर्नाटक सरकारने २०१८ साठी कन्नड आणि संस्कृती विभागाच्या राष्ट्रीय पुरस्कारांची यादी जाहीर केली

● स्वातंत्र्यसैनिक एच एस डोरेस्वामी यांना कर्नाटक सरकारकडून “बसवा राष्ट्रीय पुरस्कार” जाहीर

चनम्मा हल्लीकेरी यांना कर्नाटक सरकारकडून “भगवान महावीर राष्ट्रीय शांतता” पुरस्कार जाहीर

सी टी मालगेहिंकल महादेवीया यांना कर्नाटक सरकारकडून “जनपद राष्ट्रीय” पुरस्कार जाहीर

भारतीय महिला फुटबॉल संघ ताज्या फीफा वर्ल्ड क्रमवारीत ५७ व्या क्रमांकावर

● नेपाळ १७ जुलैपासून पर्यटकांसाठी व्हिसा फी मध्ये वाढ करणार

● दक्षिण कोरियाचे पंतप्रधान ली नॅक-यु १३ जुलैरोजी बांग्लादेशला भेट देणार आहेत

अच्युत सामंता यांना गांधी मंडेला शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● जी साथियान व ए अमलराज जोडीने ऑस्ट्रेलिया टेबल टेनिस ओपन स्पर्धेत कांस्यपदक पटकावले

१९ वा वार्षिक ग्रीनटेक पर्यावरण पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे संपन्न

● एनबीसीसीला १९ वा वार्षिक ग्रीनटेक पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला

जर्मनी २०२० मध्ये ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग इंडियलायझेशन परिषद आयोजित करणार

२०१९ आफ्रिकन युनियन परिषद नायजर मध्ये आयोजित करण्यात आली

● जागतिक आरोग्य संघटनेने श्रीलंकेला “गोवर मुक्त” देश म्हणून घोषित केले

● भारत – आशियान देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक नवी दिल्ली येथे पार पडली

पहिली जागतिक मिडीया परिषद लंडनमध्ये आयोजित करण्यात आली

आयएसएफएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धा आजपासून जर्मनीत सुरु होणार

● लोकसभेने केंद्रीय विद्यापीठे (दुरुस्ती) विधेयक, २०१९ पारीत केले

पर्यावरण प्रबंधन व हवामान बदलावर आयोजित २१ वी परिषद बंगळुरूमध्ये पार पडली

● नालकोला “गोल्डन पीकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार २०१९” ने सन्मानित करण्यात आले

मोहम्मद बर्किंडो यांची पुन्हा ओपेकच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली

● आॅडी इंडियाचे प्रमुख म्हणून बलिबीर सिंह ढिल्लोन यांची नियुक्ती करण्यात आली

● गोवा शिपयार्ड लिमिटेडचे ​​संचालक म्हणून श्री जगमोहन यांची नियुक्ती करण्यात आली

● उरुग्वेमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून दिनेश भाटिया यांची नियुक्ती करण्यात आली

● भारत – पाकिस्तान दरम्यान करतारपुर कॉरिडॉरवरील बैठक १४ जुलै रोजी वाघा बाॅर्डरवर होणार आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *